नवी मुंबई में दुबई की तरह 12,000 AI CCTV कैमरे लगाने का प्लान।
22 अक्टूबर 2026
*नवी मुंबई*
पानी के मामले में आत्मनिर्भर नवी मुंबई भविष्य में देश का सबसे सुरक्षित शहर बनेगा, जिसके लिए दुबई की तरह 12,000 AI CCTV कैमरों का नेटवर्क लगाने का प्लान है, यह बात नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन के हाउस लीडर सागर नाइक ने कही। वे नवी मुंबई रिहैबिलिटेशन सोसाइटी द्वारा आयोजित एक प्रोग्राम में बोल रहे थे। इस प्रोग्राम में नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन की मेयर श्रीमती सुजाता सूरज पाटिल और डिप्टी मेयर श्री दशरथ भगत भी मौजूद थे। इस मौके पर कई सिविक और सोशल एक्टिविटीज़ जोश के साथ ऑर्गनाइज़ की गईं।
विजयदशमी विजयोत्सव सेरेमनी में मेयर ने सीनियर सिटिज़न को ST स्मार्ट कार्ड बांटे, जबकि 'सुगंधी सिटी अभियान' के तहत आंगन गोद लेने की स्कीम के पेरेंट्स को सर्टिफिकेट देकर खास तौर पर सम्मानित किया गया। इस मौके पर 'सोनखर स्पोर्ट्स फेस्टिवल 2026' की ऑफिशियल अनाउंसमेंट भी की गई। म्युनिसिपल कॉर्पोरेशन के हाउस लीडर सागर नाइक ने शहर के भविष्य के डेवलपमेंट के बारे में बताया और सिविल सिक्योरिटी और पानी सप्लाई के मुद्दों पर म्युनिसिपल कॉर्पोरेशन के विज़न पर रोशनी डाली। सागर नाइक ने पक्का यकीन जताया कि गणेश नाइक 2027 के बारे में नहीं सोच रहे हैं, बल्कि सीधे 2047 में नवी मुंबई के बारे में सोचकर काम कर रहे हैं। गणेश नाइक का काम करने का तरीका है कि प्यास लगने पर नहीं, बल्कि पहले से कुआं खोदा जाए। पानी के मुद्दे पर बोलते हुए सागर नाइक ने कहा कि भले ही म्युनिसिपल कॉर्पोरेशन का बजट 500 करोड़ रुपये था, लेकिन MLA गणेश नाइक ने सही भविष्य को देखा और 600 करोड़ रुपये की लागत से मोरबे डैम खरीदा। गणेश नाइक के इसी विज़न की वजह से आज पूरे राज्य में सूखे के हालात होने के बावजूद नवी मुंबई शहर को भरपूर पानी मिल रहा है। नवी मुंबई पानी के मामले में पूरी तरह से आत्मनिर्भर हो गया है, और म्युनिसिपल कॉर्पोरेशन पड़ोसीपन के सिद्धांतों पर चलते हुए कामोठे और कलंबोली जैसे आस-पास के इलाकों को भी पानी दे रहा है। इसके अलावा, उन्होंने बताया कि भविष्य में बढ़ती आबादी की ज़रूरत को समझते हुए पोशीर डैम का कंस्ट्रक्शन का काम भी शुरू कर दिया गया है।
पानी के बाद, नवी मुंबई शहर अब सिक्योरिटी के मामले में सीधे वर्ल्ड क्लास शहरों से मुकाबला करेगा। सागर नाइक ने साफ़ किया कि अगले साल दुबई की तर्ज पर पूरे नवी मुंबई में 12 हज़ार CCTV कैमरों का नेटवर्क लगाया जाएगा। ये कैमरे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) टेक्नोलॉजी से लैस होंगे, और शहर का हर कोना सुरक्षित होगा। उन्होंने कहा कि हमारा मुख्य लक्ष्य क्राइम पर रोक लगाना है और किसी को भी शहर पर गलत नज़र नहीं डालने देना है।
शहर में रीडेवलपमेंट की एक्टिविटीज़ तेज़ी से शुरू हो गई हैं। इसलिए, बढ़ती आबादी के लिए किन इंफ्रास्ट्रक्चर सुविधाओं की ज़रूरत होगी, इसकी स्टडी पहले ही शुरू हो चुकी है। साथ ही, म्युनिसिपल स्कूलों में मराठी भाषा को ज़रूरी करने और इंग्लिश में पढ़ाई कराने का एक बड़ा फ़ैसला लिया गया है। साथ ही, एडमिनिस्ट्रेटिव राज खत्म होने के बाद से, लोगों के नुमाइंदों के ज़रिए लिए गए फ़ैसलों से एजुकेशनल, एनवायरनमेंटल और इंटीग्रेटेड हेल्थ पॉलिसीज़ को बढ़ावा मिला है।
सानपाड़ा - सोनखर डिवीजन में खुलेआम शराब पीने, चोरी, डकैती, चेन स्नेचिंग और रात में होने वाली रेड जैसी घटनाओं को रोकने के लिए कॉर्पोरेटर निशांत भगत के कॉन्सेप्ट पर 'डार्क स्पॉट सिक्योरिटी सर्विस' शुरू की गई। ये सिक्योरिटी गार्ड पुलिस के साथ 'पुलिस मित्र' के तौर पर काम करेंगे। यह सर्विस ऑफिशियली सानपाड़ा पुलिस स्टेशन के सीनियर पुलिस इंस्पेक्टर श्री दीपक सुर्वे को सौंपी गई।
इस प्रोग्राम में कॉर्पोरेटर निशांत भगत, कॉर्पोरेटर श्रीमती प्रीति भगत, पूर्व कॉर्पोरेटर श्रीमती वैजयंती भगत, सोशल वर्कर श्री संदीप भगत, डॉ. आर. एन. पाटिल, सीनियर पुलिस इंस्पेक्टर दीपक सुर्वे, देवेंद्र खाड़े, हेमंत देसाई, संजय यादव और विट्ठल यादव के साथ कई जाने-माने लोग और नागरिक मौजूद थे।
📙
*नवी मुंबईत दुबईच्या धर्तीवर १२ हजार एआय सीसीटीव्हीचे जाळे उभारण्याची योजना.*
*नवी मुंबई*
पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेले नवी मुंबई शहर भविष्यात देशातील सर्वात सुरक्षित शहर असेल, त्यासाठी दुबईच्या धर्तीवर तब्बल बारा हजार एआय सीसीटीव्ही कॅमे-यांचे जाळे उभारण्याची योजना असल्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते सागर नाईक यांनी सांगितले. नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सौ. सुजाता सुरज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उपमहापौर श्री. दशरथ भगत यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विविध नागरी व सामाजिक उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
विजयादशमी विजयोत्सव सोहळ्यात महापौरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना एस.टी. स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले, तर 'सुगंधी शहर अभियान' अंतर्गत अंगण दत्तक योजनेतील पालकांचा प्रमाणपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. 'सोनखार स्पोर्ट्स फेस्टीव्हल २०२६' ची अधिकृत घोषणा देखील यावेळी करण्यात आली.
महापालिकेचे सभागृह नेते सागर नाईक यांनी शहराच्या भविष्यातील विकासाचा पट मांडत,नागरी सुरक्षा आणि पाणीपुरवठा या मुद्द्यांवर महापालिकेच्या दूरदृष्टीवर प्रकाशझोत टाकला. गणेश नाईक हे २०२७ चा विचार करत नसून थेट २०४७ च्या नवी मुंबईचा विचार करून काम करत आहेत, असा ठाम विश्वास सागर नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. तहान लागल्यावर नाही, तर आधीपासूनच विहिर खोदून ठेवायची ही गणेश नाईक यांची कार्यशैली आहे.
पाण्याच्या प्रश्नावर बोलताना सागर नाईक म्हणाले की, महापालिकेचे बजेट ५०० कोटी रुपये असतानाही आमदार गणेश नाईक यांनी भविष्याचा अचूक वेध घेत तब्बल ६०० कोटी रुपये खर्चून मोरबे धरण खरेदी केले. गणेश नाईक यांच्या या दूरदृष्टीमुळेच आज संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना नवी मुंबई शहराला मुबलक पाणीपुरवठा होत आहे. नवी मुंबई पाण्याच्या बाबतीत पूर्णपणे स्वयंपूर्ण झाली असून, शेजारधर्माचे पालन करत कामोठे आणि कळंबोलीसारख्या शेजारच्या भागांनाही पाणी देण्याचे काम महापालिका करीत आहे. याशिवाय भविष्यातील वाढत्या लोकसंख्येची गरज ओळखून पोशिर धरणाच्या बांधकामाचे कामही सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पाण्यापाठोपाठ सुरक्षेच्या बाबतीतही नवी मुंबई शहर आता थेट जागतिक दर्जाच्या शहरांशी स्पर्धा करणार आहे. सागर नाईक यांनी स्पष्ट केले की, पुढील वर्षभरात दुबईच्या धर्तीवर संपूर्ण नवी मुंबईत तब्बल १२ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारले जाणार आहे. हे कॅमेरे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार असून, शहराचा प्रत्येक कानाकोपरा सुरक्षित असेल. गुन्हेगारीला आळा घालणे आणि शहरावर कुणाचीही वक्रदृष्टी पडू न देणे, हेच आमचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले.
शहरात पुनर्विकासाच्या हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. म्हणून वाढणाऱ्या लोकसंख्येला कोणत्या पायाभूत सुविधा लागतील, याचा अभ्यास आतापासूनच सुरू झाला आहे. तसेच महापालिका शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य ठेवून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यापासून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे शैक्षणिक, पर्यावरण आणि एकात्मिक आरोग्य धोरणाला गती मिळाली आहे.
सानपाडा - सोनखार विभागातील उघड्यावर मद्यपान, चोऱ्या, लुटमार, चैन स्नॅचिंग आणि रात्रीच्या वेळेस होणारे राडे यांसारख्या घटनांवर आळा घालण्यासाठी नगरसेवक निशांत भगत यांच्या संकल्पनेतून 'डार्क स्पॉट सुरक्षा सेवा' सुरू करण्यात आली. हे सुरक्षा रक्षक पोलिसांसोबत 'पोलीस मित्र' म्हणून काम करतील. सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिपक सुर्वे यांच्याकडे ही सेवा अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आली.
या कार्यक्रमाला नगरसेवक निशांत भगत, नगरसेविका सौ. प्रिती भगत, माजी नगरसेविका सौ. वैजयंती भगत, समाजसेवक श्री. संदिप भगत, डॉ. आर. एन. पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे, देवेंद्र खाडे, हेमंत देसाई, संजय यादव आणि विठ्ठल यादव यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.